तेरेखोल नदी पुलावर गोवा बनावटी दारू पकडली.; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

तेरेखोल नदी पुलावर गोवा बनावटी दारू पकडली.; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

*कोंकण एक्सप्रेस*

*तेरेखोल नदी पुलावर गोवा बनावटी दारू पकडली.; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई*

*बांदा : प्रतिनिधी*

राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली यांच्या पथकाने तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 4,14,240/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मा.श्री. मनोज शेवरे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे दि. 16/02/2025 रोजी पहाटे अवैध मद्य वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना मारुती इको चारचाकी वाहन क्र. MH-07-Q-3317 या चारचाकी वाहनाच्या पाठीमागील हौद्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ग्रॅन्डचे 24 बॉक्स (1104 बाटल्या) अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर प्रकरणी वाहन चालक- 1) गणेश लक्ष्मण चव्हाण, वय 35 वर्षे, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी व 2) सिसिल जॉन फेराव, वय 55 वर्षे, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं.रु. 1,14,240/- किंमतीचे मद्य व रु.3,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अं.रु.4,14,240/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला

सदर कारवाई श्री. भानुदास खडके, निरीक्षक, श्री. प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, श्री. धंनजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, श्री. विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, श्री. दिपक वायदंडे, जवान, श्री. सतिश चौगुले, जवान, श्री. सागर सुर्यवंशी, जवान, श्री. अभिषेक खत्री, जवान यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास श्री. धंनजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!