*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सिंधुदुर्ग चा डंका*
*वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आली होती विभागीय स्पर्धा*
*यजमान सिंधुदुर्गच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभागीय स्तरावरून सिंधुदुर्ग महसूलचे कौतुक*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे मत्स्य व बंदरे विकास मंत्री यांच्या हस्ते वेंगुर्ला येथे करण्यात आले.या स्पर्धेमध्ये कोकण विभागातील सर्व ७ जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले व स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद देखील पटकावले.
कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कणकवली तहसील कार्यालयातील कार्यरत कर्मचारी यांनी यश मिळविले आहे. कणकवली तहसील कार्यालयातील तलाठी ओंकार लोखंडे यांनी बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत सुवर्ण पदक व मिश्र दुहेरी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.
बोर्डवे तलाठी शरयू शिवणकर यांनी ४ बाय ४०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक तसेच खोखो मध्ये सुवर्ण पदक पटकावले. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर केल्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार बहाल करण्यात आला.निवडणूक नायब तहसीलदार विजय वरक व रोजगार हमी अव्वल कारकून विलास चव्हाण यांनी बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.संचलन मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकावला. यामध्ये कणकवली तालुक्यातील तलाठी नरडवे अजय मांडेकर, तलाठी सांगवे रासम, तलाठी भिरवंडे पी एस बचाटे, तलाठी खारेपाटण लुडबे, यांनी सहभाग घेतला होता.
सांस्कृतिक नाटकात मंडळ अधिकारी सापळे व बोवलेकर तसेच तलाठी श्रिया शिंदे यांनी सहभाग घेतला. तसेच क्रिकेट स्पर्धेत किरण गावडे मंडळ अधिकारी वागदे यांनी चमक दाखवली. फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाने सुवर्ण पदक मिळवित विजेते पद मिळविले. या संघात कणकवली तहसील कार्यालयातील राजेश शिरवलकर यांचा समावेश होता. स्पर्धा अतिशय रंगतदार वातावरणात पार पडल्या.