*कोंकण एक्सप्रेस*
*तेरवण येथील आरोग्य शिबीराचा २१९ रुग्णांनी घेतला लाभ*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान धारगल, गोंवा व ग्रामस्थ मंडल तेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीर मोफत वैद्यकीय शिबीर तेरवण येथे पार पडले.सुमारे २१९ गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी विजय गवस, संतोष गवस, सदाशिव गवस, उमेश गवस, सुहास गवस, नामदेव गवस, शंकर गवस, रोहन सावंत, मोहन सावंत, रमेश सावंत, तुकाराम गवस, गोपाल गवस, ऋतुजा सावंत, मंगल गवस, मंगल शंकर गवस, व इतर ग्रामस्थानी सर्व डॉक्टरांचे व सपोर्ट स्टाफ चे मानले आभार, आपुलकीने व मायेने तपासणी केली व मोफत औषध दिली.