‘केर’ गावात सापडली दुर्मिळ प्रजातीतील ‘ ड्रॉसेरा बर्मानी’ कीटकभक्षी वनस्पती

‘केर’ गावात सापडली दुर्मिळ प्रजातीतील ‘ ड्रॉसेरा बर्मानी’ कीटकभक्षी वनस्पती

*कोंकण एक्सप्रेस*

*’केर’ गावात सापडली दुर्मिळ प्रजातीतील ‘ ड्रॉसेरा बर्मानी’ कीटकभक्षी वनस्पती*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

‘केर’ येथील निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे ‘वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग ‘ संस्थेमार्फत आयोजित पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना या दूर्मिळ वनस्पतीचे दर्शन त्यांना झाले.ड्रोसेरा प्रजाती ही एक लुप्तप्राय मांसाहारी वनस्पती असुन या वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

महाराष्ट्रात सापडणाऱ्‍या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन प्रजाती उपलब्ध आहेत. ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानी. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते.

आता ‘केर ‘ गावात मांसाहारी वनस्पती सापडल्याने येथील जैवविविधता वैभव परत एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!