कणकवली तालुका फोटोग्राफर असोशियनच्या वतीने संजय राणे यांचा सत्कार

कणकवली तालुका फोटोग्राफर असोशियनच्या वतीने संजय राणे यांचा सत्कार

*कोकण Express*

*कणकवली तालुका फोटोग्राफर असोशियनच्या वतीने संजय राणे यांचा सत्कार….!*

*तालुका पत्रकारसंघाच्या सचिवपदी निवड…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुका फोटो ॲन्ड व्हिडीओ ग्राफर असोशियनच्या वतीने छायाचित्रकार संजय राणे यांची कणकवली तालुका पत्रकार समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. फोटो ॲन्ड व्हीडीओ ग्राफर असोशियनचे उपाध्यक्ष विनायक पारधीये यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री.राणे म्हणाले, छायाचित्रकाराच्यारूपाने माझी सचिवपदी निवड झाल्याने एकाअर्थाने आपल्यासर्वाचा हा सन्मान आहे.पत्रकार समिती सोबतच तालुक्यातील फोटोग्राफर असोशियनच प्रश्न देखील मार्गिलावण्याची ग्वाही त्यानी यावेळी बोलताना दिली.

यावेळी उपाध्यक्ष विनायक पारधिये, सचिव कृष्णा कांबळी, खजिनदार योगेश चव्हाण, संतोष सावंत, राजू सोहनी, मारूती मेस्त्री, नितीन कुवळेकर, विनोद दळवी, सुरजित ढवण, सतू गुडेकर, अनिकेत उचले आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!