आ. निलेश राणेंमुळे पुन्हा पायावर उभा राहिलो !

आ. निलेश राणेंमुळे पुन्हा पायावर उभा राहिलो !

*कोंकण एक्सप्रेस*

*आ. निलेश राणेंमुळे पुन्हा पायावर उभा राहिलो !*

*कोळंब येथील धीरज कांदळगावकर यांनी मानले आभार*

*मालवण : प्रतिनिधी*

एका गंभीर आजारामुळे कोळंब येथील धीरज कांदळगावकर यांना अपंगत्व आले. वैद्यकीय उपचारांचा खर्चही मोठा होता. परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगांवकर कुटुंबियांना आमदार निलेश नारायणराव राणे देव रूपात भेटले. अन धीरज कांदळगावकर यशस्वी शस्त्रक्रिये नंतर पुन्हा दोन्ही पायांवर उभे राहिले.

मालवण तालुक्यातील कोळंब खालची वाडी येथील धीरज कांदळगावकर यांना एका आजारात डाव्या पायातील बॉलची झीज झाल्याने त्यांना अपंगत्व आले होते. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यासाठी आधी त्यांना त्या आजारावर उपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर पायाचे ऑपरेशन करता येईल असे सांगितले. त्यानंतर कांदळगावकर यांच्यावर उपचार सुरु झाले. 2020 पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. तोपर्यंत धीरज हे कुबड्यांच्या आधारावर चालत होते. 2024 ला ते आजारातून मुक्त झाले.

जानेवारी महिन्यात त्यांनी पायांवर ऑपरेशनची तयारी सुरु केली. त्या काळात काही ग्रामस्थांनी थोडीफार आर्थिक मदत केली. त्यातून औषधोपचाराचा खर्च झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शासकीय योजनेतून कांदळगावकर यांचं मुंबईत जे जे रुग ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी कांदळगावकर यांना चालण्यास सांगितले असता बसविलेला बॉल पुन्हा निसटला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन करावं लागणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी दीड लाख अतिरिक्त खर्च येणार असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगावकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ऑपरेशनचे पैसे भरण्यासाठी हॉस्पिटलकडून विचारणा होत होती. मात्र, कांदळगावकर यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते.

अखेर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधून कांदळगावकर यांचे ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यानुसार 10 फेब्रुवारीला त्यांचे ऑपरेशन झाले. आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून कांदळगावकर यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. त्यामुळे पाच वर्षानंतर कोळंब येथील धीरज कांदळगावकर हे पुन्हा एकदा दोन्ही पायावर चालू शकणार आहेत. आमदार निलेश राणे यांनी मदत केली नसती तर माझे ऑपरेशन झाले नसते. असे सांगत धीरज कांदळगावर आणि कुटुंबियांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे आत्मियतेनं लक्ष देणाऱ्या आमदार निलेश राणे यांचे कार्य कांदळगांवकर कुटुंबियांनी अनुभवले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!