*कोंकण एक्सप्रेस*
*उबाठा.गटाचे माजी आमदार सुभाष बने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
रत्नागिरी जिल्ह्यातील चंपक मैदान येथे शिवसेनेच्या वतीने आभार सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, #शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केले.रत्नागिरी वासियांनी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला, शिंदे साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी .उबाठा. गटाचे माजी आमदार सुभाष बने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.शिवसेनेचे नेते श्री. रामदास भाई कदम, उद्योग व भाषा मंत्री श्री. उदयजी सामंत, राज्यमंत्री श्री. योगेशजी कदम, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री निलेशजी राणे साहेब, राजापूरचे आमदार श्री. किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक, राजन साळवी, सदानंद चव्हाण,आदी मान्यवर कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.