ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा २२ फेब्रुवारीला सन्मान

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा २२ फेब्रुवारीला सन्मान

*कोंकण एक्सप्रेस*

*ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा २२ फेब्रुवारीला सन्मान*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

पीपल्स आर्ट सेंटर, मुंबई या राष्ट्रीय पातळीवर सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्यावतीने साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांना साहित्यिक योदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे.

गेली तेरा वर्षे भारतभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेतर्फे सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या १४ व्या गौरव सोहळ्यात अन्य क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे. २२ फेब्रुवारीला २०२५ रोजी सायंकाळी जुहू, मुंबई येथे हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे.

प्रा. बांदेकर यांच्यासह डॉ. विश्वनाथ कराड, ऍथलिट रझिया शेख, इंग्रजी लेखक अजित मेनन, चित्रपट निर्माता आदिनाथ कोठारे, गायिका मंजुश्री पाटील, शिक्षण क्षेत्रातील रवींद्र कर्वे, पत्रकार श्रीकांत बोजेवार, चित्रकार सुहास बहुलकर, गिर्यारोहक विवेक शिवदे आदींनाही हा सन्मान दिला जाणार आहे.

प्रा. प्रवीण बांदेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधून ते नुकतेच प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी कादंबरी, कविता, ललित लेख आदी साहित्य प्रकारात लेखन केलं आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!