१७ फेब्रुवारीपासून कासार्डे येथे डे-नाईट जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन

१७ फेब्रुवारीपासून कासार्डे येथे डे-नाईट जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*१७ फेब्रुवारीपासून कासार्डे येथे डे-नाईट जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन*

*नांदगाव : प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील जय हनुमान क्रीडा मंडळ, कासार्डे उत्तर गावठण याच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डे नजीकच्या मैदानावर सोमवार दि. १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत एक तालुका दोन ऑल इंडिया आयकॉनचा समावेश असलेल्या डे-नाईट जय हनुमान चॅम्पियनय ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लीग पध्दतीने खेळवल्या जाणा-या या स्पर्धेतील विजेत्यास रोख एक लाख, उपविजेत्यास पन्नास हजार, उपांत्य फेरीतील पराभूत दोन्ही संघास रोख वीस हजार व मालिकावीरास फ्रिज तसेच वैयक्तिक पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहेत.या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र, गोवा व इतर राज्यासह देशातील विविध भागातून खेळाडू सहभागी होणार असून जिल्हातील क्रिडा रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय हनुमान क्रिडा मंडळ, कासार्डे उत्तर गावठण याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!