शिकारीसाठी जंगलात फिरणाऱ्या दोन्ही संशयितांची वैयक्तिक पंधरा हजाराच्या जामीनावर मुक्तता

शिकारीसाठी जंगलात फिरणाऱ्या दोन्ही संशयितांची वैयक्तिक पंधरा हजाराच्या जामीनावर मुक्तता

*कोंकण एक्सप्रेस*

*शिकारीसाठी जंगलात फिरणाऱ्या दोन्ही संशयितांची वैयक्तिक पंधरा हजाराच्या जामीनावर मुक्तता*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

मांगेली देऊळवाडी कुसगेवाडी तिठा नजीकच्या रस्ता कडेला वन्यप्राणी शिकार करण्यासाठी फिरणाऱ्या साटेली भेडशी आवाडा येथील दोन जणांना दोडामार्ग वन विभाग कडून शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना ताब्यात घेतले होते. वन्यप्राणी अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. बंदूक, इतर साहित्य जप्त केले होते. या दोन्ही संशयित आरोपी याना दोडामार्ग न्यायालय रजेवर असल्याने त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता पंधरा हजाराच्या वैयक्तिक जातमुचल्यावर न्यायाधीश कुंभार मॅडम यांनी सुटका केली संशयित आरोपी यांच्या वतीने वकील दाजी नाईक, तनुजा वस्त, नेहा नाईक यांनी काम पाहिले.

दोडामार्ग वन विभाग अधिकारी यांनी बुधवारी १२ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी मध्यरात्री मांगेली देऊळवाडी कुसगेवाडी तिठा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वन विभाग यांनी शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या रॉनी रोजी फर्नांडिस, साटेली भेडशी थोरलेभरड, गफूर मुसा शेख आवाडा साटेली भेडशी, या दोघांना बंदूक व इतर साहित्य समवेत ताब्यात घेतले होते.

सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता फिर्यादी पक्षाच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली तर आरोपीच्या वतीने वकील दाजी नाईक यांनी युक्तिवाद करून संशयित आरोपी याना चुकीच्या पद्धतीने अटक केली. तेव्हा तपासणी अंमलदार याना कारणे दाखवा नोटीस काढावी असे सांगितले. आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून ऐकून घेऊन संशयित आरोपी यांची प्रत्येकी पंधरा हजाराच्या वैयक्तिक जामीनावर सोडण्यात आले. अशी माहिती वकील दाजी नाईक यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!