*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट जि.प.शाळा सुतारवाडी ची कु. दुर्वा संजय लाड हिची अभ्यास सहलीसाठी निवड*
*ग्रामपंचायत फोंडा सरपंच सौ. संजना आग्रे यांचेकडून कु. दूर्वा व मुख्या.संजय सावंत यांचे अभिनंदन व सत्कार !*
*कणकवली : प्रतिनिधी*
राज्यांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास सहलीसाठी, फोंडाघाट जि. प. शाळा- सुतारवाडी शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी दुर्वा संजय लाड हिची जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे मार्फत निवड करण्यात आली. याबद्दल ग्रामपंचायत फोंडा चे वतीने सरपंच सौ संजना आग्रे यांनी तिचे कौतुक करून, शाळेचे मुख्याध्यापक संजय सावंत या उभयतांचा सत्कार केला. आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी बबन हळदिवे, सुंदर पारकर, मिलिंद लाड, सुभाष मरिये, दर्शना पेडणेकर, दुर्वा गोसावी, संगीता सावंत, संजय लाड, भाई तावडे, संजना लाड इत्यादी ग्रामस्थही ग्रामपंचायत सदस्य इ. उपस्थित होते.
समग्र शिक्षा अंतर्गत, राष्ट्रीय आविष्कार अभियान सन २०२४-२५ नुसार, राज्यांतर्गत अभ्यास सहल, मुख्य कार्य. अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग मार्फत आयोजित करण्यात आली आहे. या सहलीमध्ये रत्नागिरी अवकाश केंद्र, मत्स्यालय, डेरवण शिवशृष्टी, कोकण कृषी विद्यापीठ- दापोली, गडकिल्ले, दुर्ग इत्यादी चा समावेश आहे. जिल्ह्यातून निवड झालेल्या जिल्ह्यामधील मुलांमध्ये फोंडाघाट सुतारवाडी जि. प. शाळेतील ग्रामीण भागातील दुर्वा हीची निवड गौरवास्पद आहे. मुख्या. संजय सावंत, वर्गशिक्षिका दर्शना हुंबे, सहशिक्षक ठाणेकर कडूलकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत फोंडेकर, संजना लाड, सहकारी सदस्य, शिक्षकहे पालक संघाचे तिला प्रोत्साहन लाभले. कु. दुर्वा चे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.