मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या कामाचे पार्ट मालवणात दाखल

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या कामाचे पार्ट मालवणात दाखल

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या कामाचे पार्ट मालवणात दाखल*

*मालवण : प्रतिनिधी*

बहुचर्चित मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती तलवार धारी पुतळा उभारणीच्या कामास वेग आला असून या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे काम जवळ जवळ 90 टक्के पूर्ण झाले असतानाच आज नोएडा उत्तर प्रदेश येथून या पुतळा उभारणीच्या कामातील काही साहित्य आज भल्या मोठ्या ट्रकातून मालवणात दाखल झाले आहे. आज ट्रकमधून दाखल झालेले शिवपुतळ्याच्या खालील खडकरुपी बेस आणण्यात आला आहे आज दुपारी मालवणात हे पुतळ्याचे तीन बेस दाखल झाले आहे. नोएडा उत्तर प्रदेश येथून श्री राम सुतार आर्ट क्रीएशन यांच्या कंपनीतून हे पार्ट आणण्यात आले आहेत. 30 बाय 30 फूट लांबीचे हे पार्ट खडक रुपी असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीचे वरिष्ठ अधिकारी श्री महेंद्र किनी यांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!