*कोंकण एक्सप्रेस*
*ब्रह्माकुमारीज औदुंबर नगर, कुडाळ आयोजित ‘राजयोग ध्यान कक्ष’ व ‘बारा ज्योतिर्लिंग प्रतिकृती’ प्रदर्शनाचे उद्धाटन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
ब्रह्माकुमारीज कुडाळ आयोजित चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन आज दि.१४/२/२५ रोजी कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता शिरवलकर व मारुती देवस्थान कमिटी अध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन झाले.याप्रसंगी बी.के.कांचनदिदी सावंतवाडी संचालिका व बी.के.हर्षादिदी कुडाळ संचालिका यांची उपस्थिती होती.
सर्व मनुष्यामात्रांचा पिता एकच निराकार शिव परमात्मा असून विश्वबंधुत्वाचे संदेश देणारी विश्वातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एकमेव अध्यात्मिक संस्था आहे. याच संस्थेच्या वतीने कुडाळ, मारुती मंदिर या ठिकाणी प्रदर्शनीचा लाभ रविवार दि. १६/०२/२५ पर्यंत भाविकांना घेता येणार आहे. या माध्यमातून एका भव्य (१२फूट)शिवलिंगाची रचना करण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच लेझर किरणांचा इफेक्ट असलेला ‘राजयोग ध्यान कक्ष’ तयार करण्यात आला आहे. तरी सर्व भाविक कुडाळ वासियांनी या संधीचा लाभ घ्यावा. अशी आग्रहाची विनंती ब्रह्माकुमारीच कुडाळ यांच्यावतीने करण्यात येत आहे.

