*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे निकामी प्रशिक्षण साहित्याचा लिलाव*
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*
जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्ग येथेली निकामी प्रशिक्षण साहित्य लिलाव करण्यात येणार आहे. तरी सिलबंद निविदा दरपत्रक दि. 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी केले आहे.प्राप्त सिलबंद निविदा दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी समिती समोर उघडण्यात येतील व त्याच वेळी त्या दिवशी 16.30 वाजता जाहीर लिलाव घेवून वस्तू विक्री करण्यात येतील लिलाव घेणाऱ्यास त्वरीत किंमत कार्यालयास जमा करावी लागेल.
निकामी साहीत्य पहाण्यासाठी उपलब्ध आहे. शासकीय सुट्टी वगळता कार्यायीन वेळेत साहित्य पहाता येईल. लिलावाच्या दिवशी दि. 20 फेब्रुवारी रोजी लिलाव पुर्वी रु. 1 हजार अनामत रक्कम भरावी लागेल व ती लिलावा नंतर परत देण्यात यईल. टिप. काही अपरिहार्य लिलाव किंमतीपेक्षा कमी रक्कम प्राप्त होत असेल तर हातची किंमत पुन्हा काढून हाच लिलाव पुन्हा तारीख व प्रसिध्दी देऊन घेण्याचा हक्क समितीकडे राखून ठेवला आहे, याची नोंद घ्यावी.