*आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रात सोन्याचे दर कसे आहेत ?*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
महाराष्ट्रात सुद्धा आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर सध्या सारखेच दिसून येत आहेत.
आज जगात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. दरम्यान या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जर तुम्ही तुमच्या प्रियजनासाठी सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत उलटफेर झाला असून सोन्याच्या किमती शंभर रुपयांनी वाढल्यात अशी नोंद करण्यात आली आहे.