सिल्लोड येथे वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला

सिल्लोड येथे वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला

*कोंकण एक्सप्रेस*

*सिल्लोड येथे वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला*

*पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न :थोडक्यात वाचला जीव*

*छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी*

वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात ही घटना घडली आहे.या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ४ वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर महसूल विभागाच्या पथकावर वाळूतस्करांनी तुफान दगडफेक केली. एवढच नाही तर अधिकारी, कर्मचारी बसलेल्या शासकीय वाहन डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने चालकाने तात्काळ वाहन पळवल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेचा माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 4 वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून त्यापूर्वी वाळू माफियांचा गुंडगिरी पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळतो. पैठण, वैजापूर, सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात तर बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर या वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की, थेट महसूल विभागाच्या पथकावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. हा सर्व धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील दीडगाव ते उपळी रस्त्यावर रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला.

या प्रकरणी हल्ला करणाऱ्या वाळूतस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!