*कोंकण एक्सप्रेस*
*प्रशांत यादव यांचा ‘मराठा भूषण’ पुरस्काराने सन्मान!*
*अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कीर्तन महोत्सवात ‘वाशिष्ठी डेअरी’चा गौरव*
*चिपळूण : प्रतिनिधी*
कोकणात दुग्धक्रांती घडवणाऱ्या वाशिष्ठी डेअरीचा आज अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कीर्तन महोत्सवात गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांना दुग्ध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मराठा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी माजी खासदार तसेच शिवसेना (उबाठा) सचिव विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, महोत्सवाचे उद्घाटक न्यायाधीश राजेश घाणेकर, उपाध्यक्ष संतोष नानावटे, विभागीय अध्यक्ष अप्पा खैर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, शिवव्याख्याते नामदेवराव जाधव, हभप भगवान कोकरे महाराज, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद लाड, आदी मान्यवर उपस्थित होते.