*कोंकण एक्सप्रेस*
*सकल मराठा समाज, कणकवली तर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन*
*विविध स्पर्धां आणि भरगच्च कार्यक्रम*
*कणकवली : प्रतिनिधी*
प्रतिवरषाप्रमाणे सकल मराठा समाज, कणकवली यांच्या तर्फे शिवजयंती उत्सव बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्ताने विविध स्पर्धां आणि भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे होणार आहेत.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे – सकाळी ९.००वा.: शिवप्रतिमेचे पूजन,सकाळी १० .०० वा.: कणकवली शहरातून मोटार सायकल मिरवणूक,सकाळी १०.३० वा.कणकवली तालुका मराठा समाज प्राथमिक शिक्षकांतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा.
सायं. ५ वा.: रंगखांब गृप कणकवली प्रस्तुत “जयजयकार छत्रपतींचा !!!” महाराजांची गाणी, तलवारबाजी, लाठी-काठी, पोवाडा, करपल्लवी गुप्तभाषेचे सादरीकरण,सायं. ७ वा. श्री. संतोष कानडे बुवा प्रस्तुत वारकरी दिंडी भजन.
रात्रौ ९ वा. :राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धा,प्रथम क्रमांक: रु. २१००० व चषक,द्वितीय क्रमांक: रु. १५००० व चषक,तृतीय क्रमांक: रु. ११००० व चषक,उत्तेजनार्थ: प्रत्येकी (२) रु. ५०००/-
सहभागासाठी संपर्क : मधुसुदन (भाई) परब ९४२२३८११२४ / बच्चू प्रभूगांवकर ९४२२६३२६२१ सुशिल सावंत ९१३०३९६९५८ / महेंद्र सांबरेकर ९८६०३११२७७सोनू सावंत ९४२३००००७५ / बबलू सावंत ९४२२३७३१६४

