राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ*

*कोल्हापूर : प्रतिनिधी*

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका 31 जानेवारी 2025 रोजी पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. या प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!