*कोंकण एक्सप्रेस*
*सोनुर्ली येथे १५ रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने मळगाव पंचक्रोशी युवा व स्पोर्ट्स क्लब आणि श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ,सोनुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किशोर किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.