*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला उभादांडा येथील गणपतीचा वार्षिक जत्रौत्सव १६ फेब्रुवारी रोजी*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील श्री. गणपतीचा वार्षिक जत्रौत्सव रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त रात्रौ कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (कै. बाबी कलिगण) नाटक होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उभादांडा श्री. गणपती देवस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.