*कोंकण एक्सप्रेस*
*आचरा तिठा रिक्षा संघटनेच्या वतीने १४ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*मालवण : प्रतिनिधी*
आचरा तिठा येथील रिक्षा संघटनेच्या वतीने आचरा येथे १४ फेब्रुवारीला सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने, रात्री १० वाजता अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा दशावतारी नाट्यप्रयोग एक अध्यात्मिक प्रबोधन युक्त हृदयस्पर्शी विठ्ठल भक्तीवर आधारित ‘कुर्मदासाची वारी’ हे नाटक सादर होणार आहे. याचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आचरा तिठा रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

