आरंभ बालक पालक मेळावा 2025 उत्साहात संपन्न!!

*कोंकण एक्सप्रेस*

*आरंभ बालक पालक मेळावा 2025 उत्साहात संपन्न!!*

*रत्नागिरी : प्रतिनिधी*

दि. 10/2/2025 रोजी बालविकास प्रकल्प रत्नागिरी (नागरी) या प्रकल्पा अंतर्गत ६. रत्नागिरी नगर परिषद ह‌द्दीतील 17 अंगणवाड्यांचे एकत्रित आरंभ बालक-पालक मेळाव्याचे आयोजन भैरव मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले होते.

मुलांच्या सर्वांगिण विकासाकरिता आणि बाळ आईच्यगर्भात असल्यापासून ते बाळ ८ वर्षाच होईपर्यंत त्याच्या मेंदूचा विकास 85% होत असल्याने या. विकासावर आधारित सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वैज्ञानिक, शारीरिक, बौद्धिक मानसिक, सृजनशील अशा विविध विकासां संबंधी 23 प्रकारचे स्टॉल मांडले होते: या स्टॉलवरती मुले व पालक यांनी प्रत्यक्ष कृती करून मनमुराद आनंद घेतला.

लांजा राजापूर चे आमदार श्री. किरण (भैय्या) सामंत साहेब यांनी बाल मेळाव्यासाठी विशेष आर्थिक सहकार्य केले, त्याबद्‌दल त्यांचे खूप खूप धन्यवाद ! त्यांच्या व्यस्त कामामुळे बाल मेळाव्याचे उद्‌घाटन माजी नगरसेवक व शिवसेना नेते श्री. सुदेश मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी , बालविकास प्रकल्प अधिकारी मुख्यसेविका P.S.E. KIT श्रीम. कल्पना आंबवले मॅडम, खांडेकर मॅडम, श्री. नागले सर, श्री. पगडे सर तसेच माजी नगरसेविका सौ. पल्लवी पाटील, कौसल्या शेट्ये, श्र‌द्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, रशिदा गोदड, पूजा पवार, बचत गट CRP सौ. हेमाली कीर तसेच माजी नगरसेवक, सुशांत चवंडे, विकास पाटील, भाजपा सरचिटणीस श्री. अमित विलणकर, समाजसेवक श्री. सिद्धेश शिवलकर आदिनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली.

या बालमेळाव्याला 1000 ते 1200 लोक उपस्थित होते. सर्व नगरसेवक तसेच दानशूर व्यक्तींनी बाल मेळाव्यासाठी खाऊ, पाणी बॉटल, शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत केली.त्याबद्‌दल सर्वांचे मनापासून धन्यवाद ! तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या व्यवस्थितरित्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी-रित्या पार पडला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!