कारिवडे परिसरात चोरट्यांचा उपद्रव

कारिवडे परिसरात चोरट्यांचा उपद्रव

*कोंकण एक्सप्रेस*

*कारिवडे परिसरात चोरट्यांचा उपद्रव*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

कारिवडे, चराठा भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे या भागात काही घरे, काही कारखाने बंद असल्याचा फायदा घेऊन या ठिकाणी भुरट्या चोरट्यांकडून विहिरीचे पाईप, लोखंडी वस्तू चोरीच्या घटना वाढल्या आहेत. भुरटे घरात किंवा शेतात कुणी नसल्याचा फायदा घेऊन पंपाचे पाईप, मोटार, भिडाच्या वस्तू रात्रीच्या वेळी चोरून नेत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वायर, गाड्यांचे टायर, उशा चोरटे चोरून नेत आहेत. त्यामुळे त्यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंग करून दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

चोरठ्यांची एक टोळी कार्यरत असून अपघातग्रस्त गाड्यांचे टायर, बॅटरी तसेच आतील माल चोरत आहेत. बांदा भागातील नवीन डंपर या टोळीने माडखोल धरणाजवळ पळवून आणला व या डंपरचे सहाही टायर चोरून डंपर तेथेच सोडून पसार झाले. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!