बांदा येथील व्ही. एन.नाबर प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा

बांदा येथील व्ही. एन.नाबर प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*बांदा येथील व्ही. एन.नाबर प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा*

*बांदा : प्रतिनिधी*

बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.पी.एम गोवा चे फाऊंडर मेंमर तथा युवा उद्योजक श्री.अनंत वेरेणकर उपस्थित होते.तसेच त्यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.मंगेश रघुनाथ कामत उपस्थित होते.त्याचबरोबर सन्मानित अतिथी म्हणून महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.साक्षी वंजारी व आय.टी.आय.कॉलेज सावंतवाडीच्या प्राचार्या सौ.सुचिता नाईक यावेळी उपस्थितीत होत्या. तसेच वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट एस.एस.पी.एम.गोवाचे जनरल सेक्रेटरी श्री.त्रिविक्रम उपाध्ये, वाय.पी.एज्युकेशन ट्रस्ट एस.एस.पी.एम.गोवाचे जोईंट सेक्रेटरी एडवोकेट श्री.अमेय पारकर तसेच शाळेचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर आणि उद्योजक नारायण उर्फ शशी पित्रे, भिकाजी धुरी यावेळी तिथे उपस्थित होते.

यावेळी शाळेचा हेडबॉय कु.गोविंद गावकर व हेडगर्ल कु.श्रीशा सावंत हेही व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्कूल अंथेमने झाली. तदनंतर इयत्ता सातवीच्या गानवृंदाने सुमधुर आवाजात स्वागतगीत सादर केले आणि कार्यक्रमाला शोभा आणली.तदनंतर स्नेहाचे प्रतीक म्हणून पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व देवी सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी केले.नंतर पाहूण्यांची ओळख शिक्षिका सौ.दिक्षा नाईक यांनी केली.वार्षिक अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका सौ.शिल्पा कोरगावकर यांनी केला.प्रशालेचे संस्थापक श्री.मंगेश कामत यांनी आदर्श विद्यार्थी म्हणून कु.मनिषकुमार दिनेशकुमार माळी तसेच उत्कृष्ट ॲथलेट म्हणून कु. रूद्र नारायण मोरजकर या विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली व त्यांना गौरविण्यात आले.तसेच यावर्षीच्या उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सौ.कल्पना परब यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सन्मानित अतिथी सौ.साक्षी वंजारी यांनी मुख्यतः शिक्षकांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.वेरेणकर यांनी संस्थेचे कौतुक करत कार्यकारणी शिक्षकांचे सलग १६ वर्षे १०० टक्के निकाल येऊन विद्यार्थी उच्च पदावर शिक्षण घेत असल्यामुळे अभिनंदन केले व संस्थेला व शाळेला भरभरून शुभेच्छा दिल्या.नंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय वर्षातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप झाली.यावेळी सूत्रे शिक्षिका सौ.स्नेहा नाईक,रसिका वाटवे,सौ.लविना फर्नांडिस,सौ.दीक्षा नाईक यांनी सांभाळली.संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोंपिटिशन कमिटीच्या हेड शिक्षिका सुरभी सावंत यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!