*कोकण Express*
*बांदा आरोग्य केंद्रात ६० वर्षावरील जेष्ठांना कोरोना लसीकरण सुरू!*
*बांदा ः प्रतिनिधी*
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
आज सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरातील सटमटवाडी येथील ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. तसेच ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या मधुमेह, रक्तदाब, दमा, वात विकार व अन्य व्याधीवरील रुग्णांना लस घेण्यासंदर्भात मान्यताप्राप्त डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊनच आरोग्य केंद्रात लस देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचा बांदा रुग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अक्रम खान, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, माजी सभापती प्रमोद कामत, अंकुश जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, माजी उपसभापती गीतांजली सावंत, शाम सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
बांदा शहरातील ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व ४५ ते ६० वयोगटातील रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे. आज दिवसभरात शहरातील सटमटवाडी येथील व्यक्तींना लसीकरण करण्यात आले.