झाराप येथे”सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती” संपन्न

झाराप येथे”सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती” संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*झाराप येथे”सकल हिंदू समाज जनजागृती महाआरती” संपन्न*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

आज सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू पर्यटकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि संबंधित मुस्लिम समाजाला हिंदूंचा वचक दाखवण्यासाठी महाआरतीचे आयोजन केले होते, या आरतीमध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री निलेशजी नारायणराव राणे साहेब सहभागी होत समस्त हिंदू बांधवांना संबोधित केले.

या समाजाकडून गोमातेची तस्करी, पर्यटकांना मारहाण, पुतळ्याची विटंबना, अनधिकृत बांधकामे अशा अनेक गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर घडत आहेत हिंदुंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आता पेटून उठले पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, आपण संघटीत झाले पाहिजे यापुढे असे प्रकार घडले तर आम्ही पुन्हा एकत्रित येणार हा निर्धार आज सकल हिंदू समाजाने केला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, संजू परब, श्री.बबन शिंदे, प्रवक्ते रत्नाकर जोशी सौ.दिपलक्ष्मी पडते, सौ.प्राजक्ता शिरवलकर, कुडाळ तालुका प्रमुख याेगेश तुळसकर, अरविंद करलकर, कुडाळ शहर प्रमुख राेहीत भाेगटे, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, दादा साईल, साेनाली पाटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!