*कोंकण एक्सप्रेस*
*१४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान “तेंडोली महोत्सव २०२५”*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिर येथे 14 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत प्रथमच ‘तेंडोली महोत्सव 2025’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत गावातील महिलांना व लहान मुलांना खुले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांचा या महोत्सवात महत्वाचा सहभाग असणार आहे. महोत्सव कालावधीत होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत – १४ रोजी सायंकाळी ४ वाजता शोभा यात्रा, ६ वाजता महोत्सवाचा उद्घाटन सोहळा, ७ वाजता रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन, ७.३० वाजता वेशभूषा स्पर्धा- लहान गट – वय ५ ते १२ वर्षे व मोठा गट – १२ वर्षावरील, रात्री १० वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे ट्रीकसीनयुक्त ‘आयोध्याधिश श्रीराम’ नाटक, १५ रोजी सकाळी ९ वाजता आरोग्य शिबीर, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, ६ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा-लहान गट वय ५ ते १२ वर्षे, मोठा गट – वय १२ वर्षावरील १६ रोजी सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा (चौथी ते दहावी) सायंकाळी ६ वाजता तेंडोली गावातील नवोदित कलाकारांचा सुरमयी शाम- कराओके शो, 7 वाजता पारितोषिक वितरण व ऋणनिर्देशन, रात्री 9 वाजता साई जळवी फिल्म्स आणि सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आर्केस्टा जल्लोष मनोरंजनाचा महाराष्ट्र आणि गोवा मधील र लोकप्रिय गायक, वादक, कलाकारांसोबत अफलातून नृत्यांगनांचा कलाविष्कार होणार आहे. कार्यक्रमाचा लाभघ्यावा असे आवाहन समस्त तेंडोली ग्रामस्थांनी केले आहे.