गवाणकर महाविद्यालयाच्या स्वप्ना सावंत एसएनडीटी महिला विद्यापीठात प्रथम

गवाणकर महाविद्यालयाच्या स्वप्ना सावंत एसएनडीटी महिला विद्यापीठात प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*गवाणकर महाविद्यालयाच्या स्वप्ना सावंत एसएनडीटी महिला विद्यापीठात प्रथम*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

लोकमान्य ट्रस्ट संचलित सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वप्ना सुनील सावंत यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या हिंदी विषयाच्या पदव्युत्तर पदवी 2024-25 (MA Hindi) परीक्षेत संपूर्ण एसएनडीटी विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान पटकाविला असून त्यांच्या या यशाबद्दल लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा. किरणजी ठाकूर व सचिव पंढरी परब संचालिका सई ठाकूर संचालक सचिन मांजरेकर समन्वयक डॉ. मिसाळे सर सीन. एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर SNDT विद्यापीठा तर्फे स्वप्ना सावंत यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असून सावंत यांच्या यशामध्ये प्रा. आनंद नाईक व महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांचा देखील मोलाचा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!