*कोकण Express*
*कणकवली नगरपंचायतच्या ताब्यात २ घंटा गाडीचा समावेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते २ घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.
कणकवली शहरात गलोगली जाऊन या घंटा गाड्याच्या माध्यमातून ओला व सुका कचरा संकलिक करण्यात येणार आहे.त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी चा कचरा उचलण्यात सुलभ होणार आहे.१२ लाख ८० हजार किंमतीच्या गाड्या असून कणकवली हद्दीतील कचरा संकलनाचे काम अजून गतीने होण्यास मदत होणार आहे.यावेळीनगराध्यक्षसमीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी वैभव साबळे, बंडू गांगण, संजय कामतेकर, विराज भोसले,प्रियंका सोसूरकर, प्रितेश खैरे,बाळा सावंत उपस्थित होते.