*कोंकण एक्सप्रेस*
*तिलारी नदी पाञात मासेमारी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या जिलेटीन स्फोटामुळे मगरीचा मृत्यू*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
तिलारी नदी पाञात मासेमारी करण्यासाठी काही जण बेकायदेशीर जिलेटीन स्फोट घडवून मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. अशा प्रकारे मासेमारी करणाऱ्यांना पोलीस प्रशासन तसेच गावातील मंडळी दूर्लक्ष करतात. अशा प्रकारे स्फोट मुळे काही जीवावर बेतणाऱ्या घटना घडल्या तरी मासेमारी केली जाते. अशा जिलेटीन स्फोटामुळे साटेली, घोटगे, आवाडा, दरम्यान तिलारी खोल नदी पाञात मासेमारी करण्यासाठी टाकलेल्या जिलेटीन स्फोटामुळे या ठिकाणी एका मगरीचा मृत्यू झाला आहे. साटेली भेडशी नळयोजना विहिरीच्या ठिकाणी कामगार गेले असता नदी पाञात मृत मगर आढळून आली याची माहिती सरपंच याना दिली या नंतर वन अधिकारी यांना कल्पना दिली या नंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
तिलारी नदी पाञात कोनाळकट्टा, आवाडा, साटेली, घोटगे, परमे, कुडासे, मधून वाहणाऱ्या या नदी पाञात अनेक जण मासेमारी करण्यासाठी बेकायदेशीर जिलेटीन स्फोट घडवून मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या मासेमारी करतात. या भागात असलेल्या काळ्या दगड खाणीतून हे जिलेटीन स्फोटक पुरवले जाते. पण दोडामार्ग पोलीस प्रशासन बेकायदेशीर जिलेटीन स्फोट करणाऱ्यांवर काही कारवाई करत नाही.