*कोंकण एक्सप्रेस*
*ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण दिले नाही म्हणून काही तरुणांच्या जमावाने हॉटेलच्या कामगारांना गंभीर मारहाण करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची तसेच हॉटेलच्या साहित्याची तोडफोड केल्याची घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी या जमावातील संशयित वैभव मयेकर (रा. धुरीवाडा मालवण) याच्यासह अनोळखी सहा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित वैभव मयेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
