देवगड येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा

देवगड येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड येथे १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळा*

*देवगड : प्रतिनिधी*

देवगड तालुका मराठा समाजाच्यावतीने येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. शिवप्रतिमा पूजन, ९.२० वा. ध्वजारोहण, ९.३० वा. कार्यक्रम स्थळ ते देवगड किल्ल्यापर्यंत रॅली, सायंकाळी ६ वा. वेशभूषा- वक्तृत्व स्पर्धा / गट- १ (शिशुवर्ग ते चौथी), ६.३० वा. पोवाडा-न्यायी शिवराय, ६.४० वा. शिवस्तुती गीत (नारायण चव्हाण, शिरगाव), ६.५० वा. पोवाडा- गड आला पण सिंह गेला, ७.१५ वा. वेशभूषा- वक्तृत्व स्पर्धा/गट-२ (पाचवी ते दहावी), रात्री ७.४५ वा. पारितोषिक वितरण (वेशभूषा- वक्तृत्व स्पर्धा), रात्री ८ वा. रिल्स स्पर्धा, प्रेक्षपण व पारितोषिक वितरण सोहळा असे कार्यक्रम होणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!