*कोकण Express*
*कोविड काळात योगदान देणाऱ्या महिलांचा कणकवली पंचायत समितीच्या वतीने गौरव*
*सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला कार्यक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोविड काळात योगदान देणाऱ्या महिलांचा कणकवली पंचायत समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा या गौरव सोहळ्यात सहभाग होता. सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे पंचायत समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याप्रसंगी सभापती मनोज रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर , जिल्हा परिषद सदस्य संजना सावंत, श्रीया सावंत, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम , गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी व तालुक्यातील महिला सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. या सत्कार प्रसंगी डॉ. अश्विनी नवरे, डॉ.इंगवले, पियाळी ग्रामसेवक संगीता पाटील, अंगणवाडी सेविका लता डामरे, प्रेरणा नाडकर्णी, मदतनीस सीताबाई जाधव, आशा सेविका श्रद्धा गावडे , उद्योजिका मयुरी चव्हाण, पंचायत समिती वरिष्ठ सहाय्यक नीलम जाधव आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी नारीशक्ती च्या सन्माना बरोबरच महिलांनी अनेक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.