*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून सायबर सेफ्टी जनजागृती*
*दोडामार्ग : शुभम गवस*
येथील आमदार दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून सायबर सेफ्टी, या विषयावर बाजारपेठांमध्ये जनजागृती करण्यात आली.नाट्यमय वातावरणात केलेली ही जनजागृती उत्स्फूर्त पणे पार पडली.मोबाईलवर येणारे कॉल, मेसेज, कुठलीही लिंक , बँकेतून बोलत आहे असे सांगणारे , अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर बोलणं हानिकारक ठरू शकते , ऑनलाइन धोका इत्यादी मोबाईलवर होणारे नुकसान टाळण्यासाठी हे जनजागृती अभियान केले होते.
यावेळी प्रा. ए.बी ढेंगे,प्रा. महेश पाटील, प्रा. एन एम चौगुले, प्रा. एम डी पाताडे, प्रा.बी. व्ही. राशिवडे उपस्थित होते.