*कोंकण एक्सप्रेस*
*बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेत कोणतीही हयगय नको : बाबुराव धुरी*
*दोडामार्ग : शुभम गवस*
आज पासून जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, यासाठी सर्व परीक्षार्थ्याना आपण शुभेच्छा देतो, आणि प्रशासनाला विनंती आहे की, सकाळी प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी योग्य ती सोय करावी, वाहतूक व्यवस्थेत कोणतीही हयगय करू नये, कोणाला काही समस्या असल्यास जवळील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.