देवगड तहसीलदार रमेश पवार यांचं स्वागत

देवगड तहसीलदार रमेश पवार यांचं स्वागत

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड तहसीलदार रमेश पवार यांचं स्वागत*

*देवगड : प्रतिनिधी*

देवगड तहसील कार्यालय इथं पुन्हा एकदा नव्याने देवगड येथील तहसीलदार पदाचा कार्यभार तहसीलदार रमेश पवार यांनी हाती घेतला. पदावर रुजू झालेल्या तहसीलदार रमेश पवार यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. देवगड कार्यालयात पवार यांचे आगमन होताच सर्व कर्मचारी यांनी प्रवेश द्वारातच स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व ऑपरेटर, अव्वल कारकून, महसूल सहायक, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, सुरेंद्र कांबळे, गुटे, पुरवठा निरीक्षक बेबले, सेतू संचालक भाबल, ग्रामहसूल अधीकारी, मंडळ अधीकारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत काही महिन्यांपूर्वी मुबंई येथे पवार यांची प्रशासकीय बदली झाली होती. मात्र पवार यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव आणि लोकांभूमिक असलेल्या कामकाज पद्धतीमुळे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीने आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे. देवगड तहसीलदार म्हणून कामकाज करताना काही महिण्यापुर्वीच पवार यांनी तहसील परिसर कपाउंड, अभ्यंगतांसाठी बैठक व्यवस्था आदी कामकाज करवून घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!