कुडाळ येथे ७ मार्चला मोफत दिव्यांग शिबीर

कुडाळ येथे ७ मार्चला मोफत दिव्यांग शिबीर

*कोंकण एक्सप्रेस*

*कुडाळ येथे ७ मार्चला मोफत दिव्यांग शिबीर*

*कुडाळ : प्रतिनिधी*

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (C.S.R.) निधी अंतर्गत (गेल इंडिया लि. व बी.पी.सी. एल यांचा संयुक्त प्रकल्प)भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरुड शाखा यांच्या वतीने मोफत दिव्यांग शिबीर कुडाळ येथे दि. 7 मार्च २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत शांता दुर्गा मंगल कार्यालय, कुडाळ (पावशी) ,मुंबई-गोवा महामार्ग, पावशी ग्राम पंचायत समोर,कुडाळ आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी दिव्यांगासाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोजमाप शिबीर होणार आहे.अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची बाहेर कमर्शियल किंमत रु. 50 हजारापेक्षा जास्त आहे असा पाय या शिबिरात मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी गरजूंनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.कोणत्याही राज्य जिल्ह्यातील व्यक्ती नोंदणी करून शकतात.संपर्क -श्री.साठे 917 555 8356 , श्री.कुलकर्णी ८७६६४५३१९२

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!