*कोंकण एक्सप्रेस*
*ओझर गावातील ग्रामस्थांचा विकासात्मक निर्णय*
*आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत शिवसेनेत प्रवेश*
*अपूर्वा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा*
*राजापूर : प्रतिनिधी*
जि.प.गट ओणी मधील ओझर ग्रामस्थ विकास प्रवाहात सामील. कार्यतत्पर,लोकप्रिय आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत ओझर ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामध्ये मुस्लिमवाडी, साबळेवाडी, रामबाडेवाडी, तांबळवाडी,बौद्धवाडी, तेलीवाडी, धनगरवाडी मधील ग्रामस्थांचा समावेश होता.अपूर्वा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना तुमच्या कष्टामुळे,आशीर्वादाने माझे वडील आमदार झाले असल्याचे अपूर्वा यांनी सांगितले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, विभागप्रमुख मनीष लिंगायत, विभाग संघटक आत्माराम सुतार, उ.वि.प्र.प्रल्हाद नारकर, उ.वि.प्र. महादेव गुरव, मा. उपसभापती उमेश पराडकर, मा.पं..स सदस्य प्रतीक मटकर, महिला आघाडी, युवासेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते.