*कोंकण एक्सप्रेस*
*रेडी येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव*
*दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
रेडी येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून मंडळाच्यावतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सकाळी ०७.३० वाजता शिरोडा येथील श्री देवी माऊलीची ओटी भरून बाईक रॅलीने प्रस्थान, ०८.०० वाजता शिरोडा बस स्थानक येथील शिवजयंती पुजन, सकाळी ०८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथून यशवंत गड येथे बाईक रॅलीने प्रस्थान, ०९.०० वाजता यशवंतगड येथे शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक मूर्तीपूजन, १०.०० वाजता शिववंदना, ध्येयमंत्र, १०.३० वाजता लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. शिवप्रेमींनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने करण्यात आले आहे.