श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

*बांदा : प्रतिनिधी*

श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल २०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उदघाटन नवनिर्वाचित उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले.यावेळी ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत,शैलेश केसरकर,स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी,सचिव समीर परब यांच्यासह पालक उपस्थित होते.
ही स्पर्धा अंगणवाडी ते इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथी,इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी,इयत्ता नववी ते दहावी असे गट ठेवण्यात आले होते.संपूर्ण स्पर्धेत २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

राजाराम धारगळकर म्हणाले की,शिवविचार घराघरात पोहचविण्याचे चांगले कार्य स्वराज्य प्रतिष्ठान करत आहे.बांदा शहरात मुलांसाठी विविध स्पर्धा राबवून त्यांना शिवकार्यात सामावून घेण्याचे शिवधनुष्य प्रतिष्ठानने हाती घेतले आहे हे कौतुकास्पद आहे.

रेश्मा सावंत म्हणाल्या की, पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजणे ही काळाची गरज आहे.प्रतिष्ठानच्या कार्यात समाजाने देखील योगदान देणे आवश्यक आहे.प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करत प्रतिष्ठानच्या समाजाभूमीख उपक्रमांचे देखील कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ठ चित्रांचे रेखाटन केले.यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे संकेत वेंगुर्लेकर, जे.डी.पाटील, हंसराज गवळे, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, अनुप बांदेकर, रीना मोरजकर, गौरी सावंत, प्रणिता सावंत,वेदा सावंत आदिसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते,शिक्षक, पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!