जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

*कोकण Express*

*जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर!*

*आनंदवार्ता…जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर!*

*प्राथमिक शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश*

*मालवण ः  प्रतिनिधी*

३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १२ वर्षे पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे
वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व अरुण पवार यांनी दिली.
३१ डिसेंबर २०१९ पर्यंत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाकडून मंजूर होण्यासाठी व त्यातील त्रुटी दूर होण्यासाठी शिक्षक भारतीने निवेदने देवून व प्रत्यक्ष भेटी घेवून प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून पाठपुरावा केला होता. हे प्रस्ताव मंजूर झाल्याने जिल्ह्यातील २२९ शिक्षकांना वेतन विषयक लाभ मिळणार असल्याने या शिक्षकांनी समाधान व्यक्त करून प्रशासन व शिक्षक भारती यांचे आभार व्यक्त केले आहे
तसेच जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ज्या शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मागविण्यात बाबत मा.शिक्षणाधिकारी यांच्या कडे आग्रही मागणी करण्यात आली त्याची दखल घेऊन मा.शिक्षणाधिकारी यांनी तसे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत . ज्या शिक्षकांना सदर कालावधी बारा वर्षे पूर्ण झाली आहेत व मागील काही शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव राहिले असतील त्या शिक्षकांनी आपले वरिष्ठ वेतनश्रेणीचे परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयाकडे सादर करावे असे आवाहन शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!