नांदगाव महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक रोखली

नांदगाव महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक रोखली

*कोकण Express*

*नांदगाव महामार्ग उड्डाणपुलावरील वाहतूक रोखली…*

*पहिल्यांदा सर्व्हिस रोड करा ; सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी दिला इशारा..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालूक्यातील नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्यात आहे. परंतु बॉक्स वेलच्या दुतर्फा सर्व्हीस रस्त्यांवचा प्रश्न ऐरणीवर आहे .नांदगाव तिठा ,नांदगाव ओटव फाटा अशा ठिकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे . सर्व्हीस रस्ते न करताच पुलावरुन वाहतूक सुरु करत असल्याने नांदगाव ग्रामस्थांनी पुलावरील वाहतूक रोखण्यात आली.

सर्व्हीस रस्त्यांच्या मागणीसाठी ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठया प्रमाणात आंदोलन केले होते .मात्र जादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस पुरण्यात येवून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रीया थांबली होती . येथे जमिन मालकांचे म्हणने की, जादा जागा संपादनाचा आम्हाला मोबदला द्या आणि सर्व्हीस रस्त्याचे काम सुरू करा .एकाच सर्व्हीस रस्त्याने दोन्ही कडील वाहतूक सुरू असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे .तरी याबाबत लक्ष देवून प्रश्न सोडवावा अशी मागणी आहे .तसेच एकाच सर्व्हीस रस्त्याने सर्व वाहतूक होत असल्याने त्यात मुख्य मुंबई गोवा वाहतूकही पुलाचे काम पूर्ण नसल्याने सुरू होती आता संबधीत विभागाने नांदगाव तिठा वरील फ्लायओव्हरब्रिज वरून वाहतूक सुरु केलेली समजताच नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर ,उपसरपंच निरज मोरये ,रविराज मोरजकर ,ग्रा.प.सदस्य गवस साठविलकर ,मजीद बटवाले, बाळा सातोसे यांनी पुलावरून केलेली वाहतूक रोखली असून आदी सर्व्हीस रस्ते पूर्ण करा नंतरच पुलावरून वाहतूक सूरू करा अशी मागणी करत उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!