कोंकण एक्सप्रेस
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने फळवाटप
कुडाळ : प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्याला विकासाचा नवा राजमार्ग दाखवणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने कुडाळ मालवण चे लाडके आमदार तसेच आमचे आधारस्तंभ सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास संचलित नक्षत्रवन वस्तीग्रह येथे फळवाटप कऱण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय दत्ता सामंत, महिला जिल्हा प्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक सदस्यांनसमवेत केक कापून शिंदे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

