*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर माजी आमदार राजन साळवी यांचा जय महाराष्ट्र!!*
*विधानपरिषदेची आमदारकी आणि महामंडळाचे अध्यक्ष पद पडणार गळ्यात!!*
*मुंबई : प्रतिनिधी*
10 फेब्रुवारी ला माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थिती मध्ये करणार शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राजन साळवी पक्ष बदलणार!!
भाजप मध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेले राजन राजन साळवी यांना केंद्राकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने त्यांनी अखेर शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
अखेर राजन साळवी नी ठरवल 10 फेब्रुवारीला करणार माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईला प्रवेश.महामंडळाचे अध्यक्षपद आणि विधान परिषदेचे आमदारकीची माळ गळ्यात पडणार.
गेली दोन दिवस राजन साळवी आणि त्यांचे कुटुंब हे मुंबईत असून कुटुंबाने निर्णय घेतला. याबाबत आता ते दहा तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे ठाम झाले आहे.
दरम्यान महामंडळाचे अध्यक्ष पद राजन साळवी ना मिळणार असून त्यामुळे एवढ्या वर्षाचे त्यांचे स्वप्न लाल दिव्याचे साकार होणार आहे.गेली कित्येक वर्ष शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काम केलेले माजी आमदार राजन साळवी आता शिवसेनेतच प्रवेश करणार असून परंतु उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला ते सोडचिट्टी देणार आहेत.
दरम्यान राजन साळवी यांच्या प्रवेशाबद्दल मुंबईत जोरदार तयारी सुरू झाली असून त्यांच्याबरोबर लांजा आणि राजापूर तसेच रत्नागिरीतले काही कार्यकर्तेही प्रवेश करणार असल्याचे समजते.