*कोंकण एक्सप्रेस*
*ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन*
*मुंबई : प्रतिनिधी*
ज्येष्ठ पत्रकार आणि मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी झोपेतच निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्नेह त्यांना लाभला. त्यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जात होते.”बेस्ट कंडक्टर” ते “मार्मिकचे कार्यकारी संपादक” हा त्यांचा प्रवास सर्वांनाच संस्मरणीय राहील.