*कोकण Express*
*मी मंत्रिपदाचा लाचार नाही – दीपक केसरकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मी मंत्रीपदासाठी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या संधीचा फायदा व दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दाखवली आहे. मी नगराध्यक्ष नसलो तरी शहराच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार आहे. त्यामुळे जो मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईन, त्याच्या पाठीशी शहरातील जनतेने ठामपणे उभे राहायला हवे, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले.
ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार केसरकर म्हणाले, सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन मंडळ, शासन स्तरावरून निधी दिला त्याची नुकतीच उद्घाटने झालेली आहेत. सावंतवाडी नगर परिषदेला जिल्हा नियोजन मधून निधी दिला त्याचे श्रेय दुसरे लोक घेत आहेत मात्र सावंतवाडीकर जनतेला माहिती आहे मी नगराध्यक्ष असो किंवा नसो शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे ही जनता जाणून आहे असे आमदार केसरकर म्हणाले.