मालवण येथे आज ‘सिंधुदुर्ग श्री’ स्पर्धा

मालवण येथे आज ‘सिंधुदुर्ग श्री’ स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण येथे आज ‘सिंधुदुर्ग श्री’ स्पर्धा*

*मालवण : प्रतिनिधी*

बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज मुंबई व बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणारी जिल्हयातील मानाची समजली जाणारी २४ वी जिल्हास्तरीय ‘सिंधुदुर्ग श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा यावर्षी ८ फेब्रुवारी रोजी येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मालवण नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील पारितोषिके अशी स्पर्धेचा मानकरी सिंधुदुर्ग श्रीसाठी रोख २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक व जरतरी मानपट्टा. ५०, ५५, ६०, ६५ आणि ७० वर्षांवरील प्रत्येक वजनी गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे ३५००, ३०००, २५००, २०००, १५०० रुपये व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. बेस्ट पोझर ४००० रुपये व प्रशस्तीपत्रक, बेस्ट इम्प्रूव्हड ४००० रुपये व प्रशस्तीपत्रक याप्रमाणे पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा. प्रत्येक स्पर्धकाने मूळ आधारकार्ड घेऊन यावे. याप्रसंगी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबईचे अध्यक्ष नंदकुमार राणे, बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा, कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे, सचिव प्रवीण पारकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!