*कोकण Express*
*कविवर्य आ. सो.शेवरे काव्य पुरस्कारासाठी आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकणातील ज्येष्ठ विद्रोही कवी आ.सो. शेवरे यांचे साहित्यिक योगदान स्मरणात राहावे या उद्देशाने त्यांच्या कोर्ले गावातील आ. सो. शेवरे समितीतर्फे यावर्षीपासून मराठीतील उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कवीनी आपला काव्यसंग्रह पाठवावा असे आवाहन पुरस्कार समितीचे संयोजक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे.
कविवर्य शेवरे यांनी कोर्ले सारख्या ग्रामीण भागात राहुन अतिशय निष्ठेने कविता लिहिली. आणि कवितेबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक कामही केले. त्यांच्या साहित्य चळवळीतून अनेकांनी प्रेरणा घेऊन पुढे कविता लेखन केले. महिलांचे प्रश्नही त्यांनी प्रामुख्याने सोडवले. या त्यांच्या योगदानाचे स्मरण कायम राहावे म्हणून त्यांच्या गावातर्फे हा पुरस्कार या वर्षीपासून सुरू करण्यात आल्याचे श्री कोर्लेकर यांनी सांगितले.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या संग्रहाचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. नामवंत कवींच्या परीक्षक समितीतर्फे या पुरस्काराची निवड केली जाणार आहे. तीन हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट, असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कार योजनेत सहभागी होणाऱ्या कवींनी आपल्या संग्रहाची एक प्रत ३० एप्रिल पर्यँत सचिन कोर्लेकर, संयोजक कविवर्य आ.सो.शेवरे काव्य पुरस्कार समिती.’ द युनिक अकॅडेमी ,चैतन्य क्लासेस च्या बाजूला,ढालकाठी,कणकवली.४१६६०२ या पत्त्यावर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क- मो.नं.9960658458.

