*कोंकण एक्सप्रेस*
*पर्यटकांना केलेल्या मारहाणी विरोधातील आरोपीं विरोधात गुन्हे दाखल*
*अपर पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांची माहिती*
*ओरोस : प्रतिनिधी*
झाराप येथील मुंबई गोवा महामार्गावर एका पुणे येथील पर्यटकाला हॉटेल मालका कडून व त्याच्या कर्मचाऱ्या कडून मारहाण करण्यात आली, या बाबत जिल्ह्यातील काही भागातून संबंधित हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करा अशी निवेदने पोलिसांना देण्यात येत आहेत.याच पार्श्वभूमीवर आज अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन आणि पर्यटक प्रेमी जिल्हा आहे.त्यामुळे झाराप येथे पर्यटकांसोबत झालेल्या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्ग पोलिसांनी घेवून संशयित आरोपींविरोधात स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे. यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस सज्ज असून कोणताही प्रकार पर्यटकासोबत घडल्यास तात्काळ सिंधुदुर्ग पोलिसांना कळवावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक बैठक सभागृहात शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेवून पोलीस अधीक्षक रावले यांनी माहिती दिली.